Sunday, 17 March 2013

No free Consulting



विमा एजंट आपल्याला मोफत सल्ला देत असतात, असे लोकांना वाटते. हा एक गैरसमज आहे. एजंटांना विमा कंपनीकडून त्यांच्या कामासाठी कमिशन मिळत असते. विमा एजंट कमिशन आराखड्याची माहिती   करून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की, तुम्ही त्यांच्या सल्ल्यासाठी किती रक्कम अदा करत आहात. विमा नियंत्रक इर्डाने विमा पॉलिसी विकल्यानंतर एजंटांना किती कमिशन मिळेल याची मर्यादा आधीच निश्चित करून ठेवलेली आहे. याची माहिती पुढीलप्रमाणे आहे...
जीवन विमा पॉलिसी  
जीवन विमा पॉलिसीमध्ये टर्म प्लॅन, पारंपरिक प्लॅन आणि युनिट लिंक्ड प्लॅनसह अनेक प्रकारच्या योजना असतात. 1948 च्या विमा कायद्यानुसार 10 वर्षांपेक्षा अधिक जुनी विमा कंपनी पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर एका एजंटास 40 टक्क्यांपर्यंत कमिशन देऊ शकते. 10 वर्षे व त्यापेक्षा जुन्या कंपनीसाठी कमिशनची कमाल मर्यादा 35 टक्क्यांपर्यंत आहे. यानंतर दुसर्‍या व तिसर्‍या वार्षिक प्रीमियमवर 7.5 टक्के रिन्युअल कमिशन देता येते.
यानंतरच्या अवधीसाठी प्रीमियम रकमेच्या 5 टक्के कमिशन मिळते. 
विमा कंपन्यांसाठी युलिपबाबत कमिशन रकमेचा खुलासा करणे इराडाने विमा कंपन्यांना बंधनकारक केले आहे. इलस्ट्रेशनच्या (रेखाचित्र) साहाय्याने तुम्ही कमिशनच्या रकमेची माहिती घेऊ शकता. हे इलस्ट्रेशन एजंट स्वत: तुम्हाला समजावून देईल. इलस्ट्रेशनमध्ये युलिप्स प्रकरणांत प्रत्येक वर्षी लागणार्‍या शुल्कांचा उल्लेख असतो. मात्र, पारंपरिक प्लॅनमध्ये त्याचा अस्पष्ट उल्लेख असल्यामुळे देय कमिशनचे आकलन करणे कठीण असते.
जीवन विमाव्यतिरिक्त असलेल्या इतर पॉलिसी
जीवन विमाव्यतिरिक्त पॉलिसींवर 15 टक्क्यांपर्यंत कमाल कमिशन निश्चित करण्यात आले आहे. मात्र, इरडाने बिगर जीवन विम्याच्या श्रेणीत  विविध प्रकारच्या पॉलिसीवर वेगवेगळे कमिशन निश्चित करून ठेवलेले आहे. उदाहरणार्थ, वाहन विम्यात एजंटांचे कमाल कमिशन ‘आॅन डॅमेज’ कॉम्पोनंटची सुरक्षा देणार्‍या प्रीमियमवर 10 टक्के निर्धारित करण्यात आले आहे. थर्ड पार्टी विमा कव्हरसाठी प्रीमियमवर कोणतेही कमिशन मिळत नाही. आरोग्य विमा प्रकरणातही प्रीमियमच्या तुलनेत कमाल कमिशन 15 टक्क्यांपर्यंत मिळू शकते. नूतनीकरणावरही एजंटांना इतकेच कमिशन मिळत असते.
 पेन्शन पॉलिसी  
सिंगल-प्रीमियम पेन्शन प्लॅनसाठी एजंटांना 2 टक्के कमिशन निश्चित करण्यात आले आहे. एकरकमी अदा केल्या जाणार्‍या प्रीमियमवर हे कमिशन मिळत असते. मात्र, रेग्युलर प्रीमियम पेन्शन योजनांत याची मर्यादा पहिल्या वर्षासाठी 7.5 टक्के आणि नंतरच्या वर्षांसाठी 2 टक्के निश्चित करण्यात आली आहे.
 एजंट डिस्काउंट देऊ शकतात का? 
विमा कायद्यानुसार, एजंट आपल्या ग्राहकांना कमिशनचा वाटा वा पूर्ण रक्कम परत (रिफंड) करू शकत नाहीत. विमा पॉलिसी विकत घेण्यासाठी एजंटांनी ग्राहकांना लालूच देऊ नये म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या एजंटाने पॉलिसी विकत घेण्यासाठी डिस्काउंटची आॅफर दिली तर त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र, विमा कंपन्या पॉलिसीचे वैशिष्ट्य वाढावे म्हणून अधिक रकमेचा विमा काढल्यानंतर प्रीमियममध्ये सवलतीची ऑफर देऊ शकतात.  

No comments:

Post a Comment