जीवन विमा क्षेत्रावर 1956 ते 2000 पर्यंत एलआयसी या सरकारी विमा कंपनीची शंभर टक्के मक्तेदारी होती. 2000 मध्ये या क्षेत्रात खासगी कंपन्यांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. आज अनेक खासगी कंपन्या या क्षेत्रात आहेत, तसेच एसबीआय लाइफसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याही या व्यवसायात आहेत. विमाक्षेत्राचे खासगीकरण होऊन आता एक तप उलटल्याने त्याचा आढावा घेण्याची ही योग्य वेळ आहे. त्यासाठी विम्याच्या विविध योजना समजून घेतल्या पाहिजेत.
विम्याचे किती प्रकार आहेत ते आता बघू. मुख्यत: तीन प्रकार सांगता येतील. 1) टर्म प्लॅन 2) एंडॉवमेंट प्लॅन व 3) युनिट लिंक्ड प्लॅन म्हणजे युलिप.
1) टर्म प्लॅन : विमा काढलेल्या व्यक्तीचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाला तर त्याने ज्या रकमेचा विमा काढला आहे ती रक्कम त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळते. परंतु टर्म प्लॅनना मॅच्युरिटी व्हॅल्यू नसते. म्हणजे त्याचा अर्थ मुदतीअंती विमाधारक हयात असेल तर त्यास काहीही रक्कम मिळत नाही. कमीत कमी हप्ता देऊन जास्त रकमेचा विमा हवा असेल तर या विम्याला पर्याय नाही. या पॉलिसीचा उद्देश मिळवत्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर कुटुंबाला भरघोस आर्थिक सुरक्षितता देणे, हा असतो; बचत करणे नसतो. समजा 30 वर्षे वयाची व्यक्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न 4 लाख आहे व ती 58व्या वर्षी निवृत्ती होईल. समजा तिला 40 लाखांचा, 28 वर्षे मुदत असलेला टर्म प्लॅन घ्यायचा आहे. यासाठी त्या व्यक्तीला साधारण रु. 10,000 (रु. दहा हजार रुपये फक्त) वार्षिक इतका हप्ता द्यावा लागेल. किती कमी हप्त्यात किती मोठ्या रकमेचा विमा मिळतो बघा.
टर्म प्लॅन घेतलाच पाहिजे; मात्र त्यात बचतीचा घटक समाविष्ट नसतो, हे आपण बघितले. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा निवृत्तीनंतर सन्मानाने राहण्यासाठी मोठी रक्कम हवी असते. त्याकरिता बचत राहणे आवश्यक असते. ज्या लोकांना विम्याबरोबरच बचत किंवा गुंतवणूक करायची आहे त्यांच्याकरीता दोन प्रकारचे प्लॅन आहेत ते एंडॉवमेंट प्लॅन व युनिट लिंक्ड प्लॅन म्हणजे युलिप. हे दोन्ही प्लॅन समजावून घेऊ.
एंडॉवमेंट प्लॅन : ही एक पूर्वापार चालत आलेली पॉलिसी आहे. विमाक्षेत्रात खासगी कंपन्या येण्यापूर्वी याच प्रकारच्या पॉलिसी मोठ्या संख्येने विकल्या जात. दीर्घ मुदतीनंतर एक निश्चित रक्कम हवी असेल तर हा प्लॅन उपयुक्त आहे. या विम्याचा हप्ता काही घटकांचा मिळून निश्चित केलेला असतो. त्यात बचतीचा हप्ता असतो, टर्म प्लॅनचा हप्ता असतो, कंपनीचे काही चार्जेस असतात, एजंटचे कमिशन असते, या सर्व घटकांचा हप्त्यात समावेश असतो. आपल्यातर्फे मग विमा कंपनी या हप्त्यातील काही रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवत जाते व मुदतीअंती आपल्याला एक मोठी रक्कम मिळते. प्रीमियम बॅक प्लॅन, मनी बॅक प्लॅन, मुलांच्या नावाने असणारे काही प्लॅन हे याच एंडॉवमेंट प्लॅन प्रकारात येतात. या अॅशुअर्ड रिटर्नची म्हणजे निश्चित परताव्याची हमी देणार्या पॉलिसी आहेत. प्रचलित व्याजदर व इतर अनेक बाबींवर हा परतावा किती मिळेल ते अवलंबून असते. सध्या हा परतावा सुमारे सहा टक्के मिळतो. तसेच या पॉलिसीमध्ये बोनस मिळतो, अगदी शेवटी टर्मिनल बोनस मिळतो, हे सर्व हिशोबात घेऊनही अशा पॉलिसीवरील परतावा सुमारे सहा टक्के असतो. किंबहुना मिळणारा बोनस म्हणजेच या पॉलिसीमधील परतावा होय.
युनिट लिंक्ड प्लॅन म्हणजे युलिप : खासगी विमा कंपन्यांनी अशा प्रकारची पॉलिसी लोकप्रिय केली. एंडॉवमेंट प्लॅनप्रमाणे या विम्याचा हप्ताही काही घटकांचा मिळून निश्चित केलेला असतो. त्यात बचतीचा हप्ता असतो, टर्म प्लॅनचा हप्ता असतो, कंपनीचे काही चार्जेस असतात, एजंटचे कमिशन असते, या सर्व घटकांचा हप्त्यात समावेश असतो. पण एंडॉवमेंट प्लॅनपेक्षा ही अत्यंत भिन्न पॉलिसी आहे. एंडॉवमेंट प्लॅन मुदतीअंती निश्चित रकमेची हमी देणारी योजना आहे, तर युलिपमध्ये अशी हमी नसते. याचे कारण असे, की तुमच्या विम्या हप्त्यापैकी जी रक्कम गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे ती शेअर बाजार, रोखेबाजार इत्यादी ठिकाणी गुंतवली जाते व त्या गुंतवणुकीचे मूल्य कमी-जास्त होत असल्याने परतावाही त्यावर अवलंबून असतो. मात्र युलिप म्हणजे केवळ शेअर बाजारातच गुंतवणूक नाही. आपल्याला निवडीचा पर्याय असतो. आपण दिलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करणार्याला फंडात म्हणजे इक्विटी फंडात की डेट फंडात म्हणजे सरकारी रोखे, बँकांचे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कंपन्यांमधील ठेवी अशा फंडात गुंतवायची ते आपण ठरवू शकतो व वेळोवेळी त्यात बदल करू शकतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जास्त धोका असतो, पण फायदाही जास्त होऊ शकतो. धोका पत्करण्याची तयारी असेल तर शेअरबाजारात गुंतवणूक होत असलेल्या इक्विटी फंडाची निवड करावी. अजिबात धोका नको असेल तर डेट किंवा लिक्विड फंडाची निवड करावी. एका फंडात ठेवलेली रक्कम नंतर दुसर्या फंडात वळवता येते. त्याला स्विच म्हणतात.

No comments:
Post a Comment