विमा कंपन्या विम्याचा हप्ता (प्रीमियम) ठरवताना तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक माहितीसोबत वैवाहिक स्थितीची विशेष माहिती घेत आहेत. तुम्ही जर डॉक्टर, इंजिनिअर असाल, तुमच्याकडे बंदिस्त पार्किंग असेल आणि तुमचा गाडीचा वापर योग्य पद्धतीने होत असल्यास वाहन विम्याचे नूतनीकरण करताना घसघशीत सूट मिळू शकते. वाहन विमा प्रकारात मोठे नुकसान झाल्याने विमा कंपन्या नुकसान टाळण्यासाठी नवे नवे पर्याय स्वीकारत आहेत. याचाच भाग म्हणून एकाच पॉलिसीसाठी वेगवेगळ्या रकमांचा पर्याय पुढे आणला जात आहे. यानुसार विमा दाव्यांची संख्या वाढल्यास हप्ता वाढणार आणि दाव्यांची संख्या कमी राहणार असल्यास कमी हप्त्याचा पर्याय निवडता येईल.
वाहनाचा विमा हप्ता ठरवताना कंपन्या इंजिन क्षमता, गाडीचे आयुष्य आणि गाडीचा वापर यांसारख्या गोष्टींकडे लक्ष देत होत्या; पण गेल्या चार वर्षांत विमा कंपन्यांनी यात आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी जोडल्या आहेत. (उदा. वाहनात कोणते इंधन वापरले जाते, वाहनात चोरी प्रतिबंध उपकरणे लावली आहेत काय?) विमा कंपन्या वाहनाचा विमा हप्ता ठरवताना आता वय, व्यवसायासोबत वैवाहिक स्थितीचीसुद्धा माहिती घेत आहेत, असे जाणकारांचे मत आहे. वैवाहिक स्थितीचा हप्त्यावर प्रभाव पडतो, असे त्यांचे मत आहे. (उदा. वाहन खरेदी करणारा विवाहित असून त्याचे वय 32 ते 60 च्या दरम्यान असल्यास हप्त्यात मोठी सूट मिळू शकते.) लग्न झालेला व्यक्ती जास्त जबाबदारीने वागत असतो. त्यामुळे गाडी चालवताना तो खबरदारी घेत असतो. म्हणून हप्त्यात त्याला ऑफर दिली जाते.

प्रपोजल फॉर्ममध्ये द्यावी माहिती
प्रपोजल फॉर्ममध्ये स्वत:विषयी जेवढी जास्त माहिती द्याल तेवढा त्याचा फायदा होईल. काही कंपन्या महत्त्वाची माहिती देणार्या व्यक्तीला 5 टक्के जास्त सूट देतात. पॉलिसी ऑनलाइन घेतली असल्यास ही सूट पाच ते सात टक्क्यांपर्यंत असते. फॉर्म भरताना ही माहिती देण्यास टाळणार्याला या डिस्काउंटला मुकावे लागते. जर तुम्ही तुमच्या वाहनाची चांगली काळजी घेत असाल तर प्रीमियममध्ये सूट मिळते. मालकाची वाहन वापरण्याची पद्धती, बंदिस्त पार्किंग आणि वेळोवेळी वाहनाची देखभाल करण्याची सवय असणार्या ग्राहकांकडून विम्याचे क्लेम करण्याचा प्रकार कमी असतो. म्हणून अशा ग्राहकांना प्रीमियममध्ये सूट देणे विमा कंपन्यांसाठी फायद्याचा सौदा ठरतो.

पॉलिसीची करावी ऑनलाइन खरेदी
जर तुम्ही ब्रोकर किंवा एजंटकडून पॉलिसी घेणार असाल तर कंपनीच्या वतीने देण्यात येत असलेल्या डिस्काउंटची माहिती तो देईल याची हमी नाही; पण ऑनलाइन पॉलिसी घेतल्यास कंपन्या आकर्षक डिस्काउंट देतात. यामुळे स्वत:चे पैसे वाचण्यास मदत होते.

नो क्लेम बोनस राखून ठेवा
विमाधारकांनी मागील वर्षात कोणताही क्लेम केला नसल्यास त्यांना पॉलिसीचे नूतनीकरण करताना नो क्लेम बोनस म्हणून रिवॉर्ड दिला जातो. त्यांच्या पॉलिसीचे कव्हर 50 टक्क्यांनी वाढवले जाते. नो क्लेम बोनस मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. किरकोळ गोष्टीसाठी विमा क्लेम करू नये. किरकोळ क्लेम न केल्यास पहिल्या वर्षी 20 टक्के, तर त्यापुढील वर्षी 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. एनबीसी हे वाहन किंवा पॉलिसीसाठी नसतात, तर ग्राहकांसाठी असतात. ग्राहक या बोनस पॉइंटचा नवी पॉलिसी घेतानासुद्धा वापर करू शकता.

गाडीची निवड काळजीपूर्वक करावी
इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे डिझेल गाड्या खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डिझेल आणि सीएनजी गाड्यांच्या विम्यासाठी जास्त खर्चाची पॉलिसी घ्यावी लागते. डिझेल, सीएनजीच्या तुलनेत पेट्रोल वाहनांचा प्रीमियम कमी असतो. वाहन खरेदी करताना या गोष्टीचा विचार करणे गरजेचे असते. स्वस्त इंधनाचे वाहन खरेदी करणार असाल तर जास्त विमा हप्ता भरण्याची तयारी ठेवावी लागेल.

चोरी प्रतिबंधक उपकरणाचा वापर
तुम्ही जर गाडीत चांगले चोरी प्रतिबंधक उपकरण बसवले तर तुम्हाला विमा हप्त्यात आकर्षक सूट मिळते. ही उपकरणे बसवताना या गोष्टीकडे लक्ष द्या की, उपकरणे ऑटोमोबाइल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)ने प्रमाणित केलेली असावीत. वाहनात अशी सोय बसवल्यास विमा कंपन्यांना ग्राहकाची मानसिकता कळते. आपल्या वाहनाविषयी ग्राहक अति सजग असल्याने अशा ग्राहकांना विमा कंपन्या डिस्काउंट देण्यात पुढाकार घेतात. अशी उपकरणे लावणार्या ग्राहकांचे विमा दावे 80 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

No comments:
Post a Comment