Sunday, 17 March 2013

Get Your Riders



आयुर्विम्यात मिळणारा रायडर्स हा एक वेगळा फायदा आहे. पॉलिसी घेतेवेळी रायडर्स खरेदी करता येतात. यामुळे अधिक विमा संरक्षण मिळते. विमा पॉलिसींबरोबर सर्वसाधारणपणे उपलब्ध असणारे रायडर्स असे...
*अपघाती मृत्यू बेनिफिट रायडर  : मूळ आयुर्विम्याव्यतिरिक्त अपघाती संरक्षण घेणाºयांसाठी हे रायडर फायदेशीर आहे. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास (नॉमिनी) विम्याची अतिरिक्त
रक्कम मिळते.

*अपंगत्व बेनिफिट रायडर :  अपंगत्वाला संरक्षण देणारे हे रायडर आहे. अपघातामुळे येणाºया कायमस्वरूपी तसेच तात्पुरत्या अपंगत्वाच्या बाबतीत हे रायडर उपयोगी ठरते. जर संपूर्ण अपंगत्व आले असेल, म्हणजेच एक किंवा त्यापेक्षा अधिक हात-पाय कायमचे अधू झाले असतील तर किंवा पूर्ण अंधत्व आले असेल तर रायडरची पूर्ण विमा रक्कम
मिळते. अंशत: अपंगत्वाच्या परिस्थितीत रायडरची 50 टक्के विमा रक्कम मिळते.
*क्रिटिकल इलनेस रायडर : हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या आजाराच्या उपचारांवर होणाºया खर्चाला यात संरक्षण मिळते. विमाधारकाला रायडरच्या सूचीत असलेल्या आजारांपैकी एखादा विकार झाला तर पूर्ण रक्कम एकावेळी मिळते. रायडर संपते; परंतु मूळ पॉलिसी मात्र कायम राहते.
*प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर : अपंगत्व तसेच इतर काही कारणांमुळे भविष्यात हप्ता (प्रीमियम) न भरता येण्याच्या स्थितीत हे रायडर फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत प्रीमियम माफ होतो, मात्र पॉलिसी सुरू राहते. हे रायडर उर्वरित प्रीमियम रकमेचा विमा असल्याप्रमाणे कार्य करते.
*इन्कम बेनिफिट रायडर : पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना उत्पन्न देण्यासाठी हे रायडर उपयुक्त ठरते. यामुळे त्या कुटुंबाला नियमित विमा रक्कम तर मिळतेच, त्याशिवाय पाच ते 10 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी
अतिरिक्त रक्कम मिळते. तसेच सम अ‍ॅशुअर्ड रायडरच्या 10 टक्के रक्कम लाभार्थीला दरवर्षी मिळते. रायडरच्या मुदतीपर्यंत हा लाभ मिळतो.

लक्षात ठेवा : रायडरसाठी जास्तीची रक्कम द्यावी लागते. कोणतेही रायडर खरेदी करण्यापूर्वी त्याद्वारे मिळणा-या फायद्यांची चौकशी करा. आरोग्य विमा कंपन्यांकडेही अपघात विमा तसेच क्रिटिकल इलनेस पॉलिसी उपलब्ध आहेत, त्या अधिक सर्वसमावेशक असू शकतात. तर प्रीमियम वेव्हर बेनिफिटसारखे रायडर विविध परिस्थितीत आयुर्विम्यास सहायक ठरू शकते. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गरजेनुसार पर्यायांची निवड करावी.

No comments:

Post a Comment