Sunday, 17 March 2013

How to claim Your Insurance



जीवन विम्याचा दावा एक तर पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर  वा मृत्यूनंतर केला जातो. मॅच्युरिटी क्लेममध्ये विमा कंपनी तुम्हाला फक्त रक्कम परत करते. डेथ क्लेम हा विमाधारक आणि विमा कंपनीमधील एक करार असतो. यात कंपनी विमाधारकाला डेथ बेनिफिट देण्याची हमी देत असते. जीवन विम्याचा मूळ उद्देश हा विमाधारकाला जोखमीविरुद्ध सुरक्षा प्रदान करणे असा असतो.
अशी आहे क्लेमची प्रक्रिया 
विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नॉमिनी वा असायनीला याची लेखी सूचना विमा कंपनीला द्यावी लागत असते. याला ‘लेटर ऑफ डेथ इंटिमेशन’ असे म्हटले जाते. यात खालील माहिती असते...
1. मृत्यू प्रमाणपत्र  2. जन्मतारीख 3. मृत्यूचे कारण 4. मृत्यूचे ठिकाण 5. पॉलिसी क्रमांक.
क्लेमसाठी आणखी काही माहिती गरजेची असू शकते. ती पॉलिसीच्या कालावधीवर अवलंबून असते. जर विमाधारकाचा मृत्यू अनैसर्गिक पद्धतीने जसे की, अपघात, आत्महत्या वा इतर अज्ञात कारणामुळे झाला असेल तर विमा कंपनी लाभार्थीला आणखी काही माहिती व लेखी प्रक्रिया करण्यास सांगू शकते.
अनेक कागदपत्रे गरजेची - दावा करणा-याला विमा कंपनीकडून जारी होणारा क्लेम फॉर्म भरून सादर करावा लागतो. जर पॉलिसीमध्ये कुणाला नॉमिनी केले गेले नसेल तर वारसदाराची कायदेशीर साक्ष्य, मृत्यू प्रमाणपत्र, अंत्यविधीच्या वेळी उपस्थित असलेल्या दोन साक्षीदारांच्या स्वाक्ष-या सादर कराव्या लागतात. याशिवाय मूळ पॉलिसीचे दस्तऐवज, जर अनैसर्गिक करणांमुळे मृत्यू आला असेल तर एफआयआर आणि पोस्ट मार्टेमचा अहवालाही सादर करावा लागतो.

कोणत्या प्रकारे मृत्यू झाला व कारणाची माहिती सादर करण्याची वेळ येऊ शकते. याशिवाय काही सहायक कागदपत्रे जसे की, डॉक्टरचे नाव, हॉस्पिटलचे नाव आणि पत्त्यासह मेडिकल हिस्ट्रीचीही आवश्यकता भासू शकते.जर आणखी कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता भासली तर विमा कांनी दावा करणा-याकडून अतिरिक्त माहिती मागू शकते. 
क्लेम लवकर मिळावा म्हणून दावा दाखल करणा-यास सर्व कागदपत्रे इत्थंभूत माहितीसह विमा कंपनीकडे दाखल करण्याची आवश्यकता असते. कंपनीच्या गरजेनुसार सर्व कागदपत्रे दाखल केली नाही तर कंपनी क्लेम मंजूर करणार नाही.
क्लेम पेमेंटची मुदत - विमा नियंत्रक संस्था इराडाच्या नियमांनुसार विमा कंपनीला डेथ क्लेमचे पेमेंट सर्व कागदपत्रे मिळाल्याच्या 30 दिवसांत करणे बंधनकारक आहे. जर कंपनीला कोणत्याही प्रकारची खातरजमा करायची असेल तरही सर्व कागदपत्रे मिळाल्याच्या सहा महिन्यांत विम्याची रक्कम लाभार्थीला देणे बंधनकारक आहे.
या मुद्द्यांकडे असू द्या लक्ष - नॉमिनीचे नाव काटेकोरपणे तपासून घ्या. तुमच्या सध्याच्या पत्ताही कंपनीकडे आहे, याकडेही लक्ष असावे. आपली पॉलिसी जपून ठेवा, म्हणजे नॉमिनीला गरज भासल्यानंतर ती शोधण्यास वेळ लागू नये. री-असाइनमेंटच्या प्रकरणांततुम्हाला नवीन नॉमिनेशन देण्याची गरज भासेल. जर क्लेम मिळण्यास अडचणी येत असतील तर तुमचा विमा एजंट किंवा कंपनीकडे तुम्ही संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, जीवन विमा तुमच्यापुरताच नाही. तो तुमच्या कुटुंबीयांसाठी आहे, जो तुम्ही हयात नसल्यानंतर त्यांच्या कामी येईल.

No comments:

Post a Comment